नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीनंतर आज सर्वात मोठी सुनावणी होत आहे. निवडणूक आयोगात राष्ट्रवादी कुणाची , घड्याळ हे चिन्ह नेमकं कुणाला मिळणार याबाबत सुनावणी होत आहे. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर आहे असा दावा अजित पवार गटाने केला आहे. सुनावणीसाठी शरद पवार हे स्वत: नवी दिल्लीत सुनावणीला उपस्थित आहेत. शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हे युक्तिवाद करत आहेत.
निवडणूक आयोगातील सुनावणी
- दुपारी चारच्या सुमारास निवडणूक आयोगातील सुनावणीला सुरुवात
- स्वत: शरद पवार सुनावणीसाठी निवडणूक आयोगात दाखल
- शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, जितेंद्र आव्हाडही उपस्थित
- शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, जितेंद्र आव्हाडही उपस्थित
- अजित पवार गटाकडून सुनावणीसाठी कोणीही उपस्थित नाही
- अजित पवार गटाकडून पक्ष घटनेचा दाखला
- कोणत्याही नियुक्त्या एका पत्राद्वारे होतात, अजित पवार गटाचा युक्तिवाद
- 24 पैकी 22 राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमच्या बाजूने हा शरद पवार गटाचा दावा अजित पवार गटाकडून खोडण्याचा प्रयत्न
- आमदारांची संख्या आमच्या बाजूने, अजित पवार गटाचा दावा
- महाराष्ट्र आणि नागालँडचेही आमदार आमच्या बाजूने, अजित पवार गटाचा युक्तिवाद
- पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निघून गेला, त्यामुळे आमदारांची संख्या हाच महत्त्वाचा मुद्दा – अजित पवार गट
- जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर, अजित पवार गटाचा सर्वात मोठा दावा
- पक्षाची स्थापना कशी झाली? पक्षाचं काम कसं चालतं या संदर्भात अजित पवार गटाचा युक्तीवाद
- 55 आमदार आणि 2 खासदारांचा आम्हाला पाठिंबा, अजित पवार गटाचा दावा.
- एक गट आम्हाला सोडून बाहेर पडला, पण मूळ पक्ष आमचाच, शरद पवार गटाचा प्रतिदावा
- आमदार सोडून गेले असले तरी पक्षावरचा दावा आमचाच योग्य आहे- शरद पवार गट