सोलापूर : अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रीय दिगंबर जैन कासार समाजाचे प्रतिनिधित्व करणारी दिगंबर जैन कासार समाज संस्था (भारत) या संस्थेच्या कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोर्ले यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे अरिहंत सभागृहात संपन्न झाली. यावेळी पुढील पाच वर्षासाठी संस्थेच्या अध्यक्षपदी पुणे येथील विजयअण्णा कासार यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणीची निवडही करण्यात आली.
जैन कासार समाज संस्था स्थापन करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला व आजपर्यंत संस्था उभारणीत सिंहाचा वाटा असलेले विद्यमान केंद्रीय उपाध्यक्ष व संस्थेचे आधारस्तंभ श्री.विजयअण्णा कासार यांची सर्वानुमते पुढील कालावधीकरिता अध्यक्षपदाचा प्रस्ताव पोपटलाल डोर्ले यांनी मांडला व सर्वानुमते त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
कार्यकारिणी अशी-
संस्थापक अध्यक्ष- पोपटलाल डोर्ले, अध्यक्ष- विजयअण्णा कासार (पुणे), केंद्रीय उपाध्यक्ष- प्रकाश मांगले (नवी मुंबई), कार्याध्यक्ष- महावीर दुरुगकर (सोलापूर), सचिव- अजित मोहिरे (रत्नागिरी), कोषाध्यक्ष- महावीर मांगले (सांगली), संघटनमंत्री- प्रा.सुभाष दगडे (पुणे), सहकोषाध्यक्ष- सुहास काटकर (रत्नागिरी), उपाध्यक्ष- उदय लेंगडे (पुणे), राजेंद्र येवनकर (बार्शी), डाॅ. अभयकुमार गुंगे (विदर्भ), दयानंद मांगले (कोकण), प्रा.धन्यकुमार बिराजदार (सोलापूर), विलास वानरे (मराठवाडा), तसेच शैक्षणिक शिष्यवृत्ती समितीच्या प्रमुखपदी प्राचार्य अशोक साळवी (आष्टी), ॲड. सौ. प्रभा मांगले (राजापूर, अध्यक्ष- महिल्या कल्याण समिती), ॲड. सौ. नीता मंकणी (सोलापूर, उपाध्यक्ष- महिल्या कल्याण समिती), दिलीप खोबरे (इतिहास व संशोधन व प्रसिद्धीप्रमुख) तसेच सर्व जिल्हाध्यक्षांची कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
पोपटलाल डोर्ले यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अध्यक्ष विजयअण्णा कासार यांनीही आपले मनोगत व्यक्त करून भविष्यात या संस्थेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक या भागात करून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून समाजातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तसेच महाराष्ट्रातील सर्वच भागात जेथे जैन कासार बांधव आहे त्यांच्यापर्यंत ‘जैन कासार समाचार’ या मासिकाच्या माध्यमातून पोहोचण्याचा मानस जाहीर केला. सूत्रसंचालन प्रा.सुभाष दगडे यांनी तर आभार किरण मांगले यांनी मानले. यावेळी महाराष्ट्रातून संस्थेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.