• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, May 11, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जय मार्कंडेय च्या जयघोषात पदमशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचा शतकमहोत्सवी रथोत्सव मिरवणूक जल्लोषात

by Yes News Marathi
August 30, 2023
in इतर घडामोडी
0
जय मार्कंडेय च्या जयघोषात पदमशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचा शतकमहोत्सवी रथोत्सव मिरवणूक जल्लोषात
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डिजेचा दणदणाट
आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष

सोलापूर:- नूलू पुन्नम अर्थात नारळी पौर्णिमेला पदमशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे, यंदा शतक महोत्सवी वर्ष असल्याने समाजबांधवामध्ये रथोत्सवाबद्दल मोठा उत्साह होता,दरम्यान बुधवारी नारळी पौर्णिमा निमित्ताने मार्कंडेय मंदिरात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती.

दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागली होती, या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.पहाटे 4 वाजता श्री गणेश पूजा,श्री रुद्र याग,नवग्रह पूजन,श्री चे रुद्राभिषेक मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलं,सकाळी 6 वाजता पदमशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते पदमध्वजारोहण करण्यात आलं,पदमशाली पुरोहित संघमच्या सहकार्याने यज्ञोपवीत धारण आणि रक्षाबंधन विधी पार पडलं, यानिमित्ताने मंदिरातील मार्कंडेय महामुनींच्या मूर्तीस सोन्याच्या आभूषणांनी सजवण्यात आले होते त्याचप्रमाणे मंदिरात आकर्षक लक्षवेधी फुलांची सजावट करण्यात आली होती,दरम्यान सकाळी 11 वाजता पालखी आणि उत्सव मूर्ती मंदिराबाहेर आणण्यात आलं, उत्सव मूर्ती रथावर ठेवण्यात येऊन त्याचे विधिवत पूजन करण्यात आले.

याप्रसंगी पोलीस आयुक्त राजेंद्र माने,आमदार प्राणिती शिंदे,माजी महापौर महेश कोठे,पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी,सचिव संतोष सोमा,
अंबादास बिंगी,राजाराम गोसकी, जनार्दन कारमपुरी,-रामकृष्ण कोंड्याल, मुरलीधर आरकाल, नरसप्पा इप्पाकायल, रामचंद्र जन्नू,माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे,राजमहिंद्र कमटम,रमेश कैरमकोंडा,महांकाली येलदी,पदमशाली युवक संघटना अध्यक्ष तुषार जक्का,श्रीकांत दासरी यांची प्रमुख उपस्थिती होती, दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार प्रणिती शिंदे,शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी मार्कंडेय मंदिरात येऊन दर्शन घेतलं,दरम्यान जय मार्कंडेय
च्या जयघोषात ही मिरवणूक मार्गस्थ झाली,कन्ना चौक पदमवंशम संघटनेच्या वतीने आणि माजी नगरसेविका इंदिरा कुडक्याल यांच्या वतीने विजापूर वेस येथे भव्य रांगोळी साकारण्यात आली होती.

यावेळी जय मार्कंडेय चा जयघोष करण्यात आला,त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने मार्कंडेय रथावर पुष्पवृष्टी करण्यात येऊन हम सब एक है च्या घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी यंदाच्या वर्षी 35 मंडळांचा मिरवणुकीत सहभाग असल्याचं सांगितल.

दरम्यान शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, माजी महापौर महेश कोठे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान मिरवणुकीत अग्रभागी दोन अश्व चोपदार आणि भालेदार होते,पालखीत शिवलिंग आणि बैलजोडीच्या रथावर उत्सव मूर्ती होती यावेळी दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भक्तगणांनी गर्दी केली होती, या मिरवणुकीत श्री दत्तात्रय शक्ती लेझीम संघाच्यावतीने बहारदार लेझीमचा डाव सादर करण्यात आलं.

तसेच विविध विवेकानंद शक्तिप्रयोग मंडळाने अंगावर शहारे आणणारे शक्तीप्रयोग सादर करून लक्ष वेधले.
दरम्यान मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डिजेचा समावेश होता,डॉल्बीच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता,अनेक मंडळांनी आकर्षक देखावा सादर करून लक्ष वेधून घेतला. विविध डान्स ग्रुपने तेलुगू, हिंदी आणि मराठी गाण्यांवर आपली नृत्य कला सादर केली. मिरवणूक मार्गावर जय मार्कंडेयचा जयघोष करण्यात येत होता,हि मिरवणूक मार्कंडेय मंदिर येथून निघून भारतीय चौक,रत्नमारुती चौक,जमखंडी पूल,पदमशाली चौक,दत्त नगर,मार्कंडेय रुग्णालय,जोडबसवण्णा चौक,राजेंद्र चौक,बुलाभाई चौक,कन्ना चौक,उद्योग बँक,साखर पेठ,गुरुवार पेठ, समाचार चौक,माणिक चौक म,विजापूर वेस मार्गे मार्कंडेय मंदिर येथे उशिरा समारोप करण्यात आला.

मिरवणुकीत वस्त्र विणून मार्कंडेयना अर्पण
मिरवणुकीत भिक्षपती कंदीकटला आणि यशोदा कंदीकटला यांनी पारंपरिक हातमागावर दिवसभर वस्त्र विणून रात्री तयार झालेले वस्त्र श्री मार्कंडेय महामुनींच्या चरणी अर्पण करून आपली सेवा बजावली.
मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
मिरवणूक विजापूर वेस येथे येताच छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने मार्कंडेय रथावर पुष्पवृष्टी करण्यात येऊन हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडविलं, यावेळी पदमशाली समाजातील मान्यवरांचा सत्कार करून मुस्लिम बांधवांनी हम सब एक है चा नारा दिला.
सहभागी मंडळ घोंगडे वस्ती प्रतिष्ठान,राडा बॉईज,संयुक्त हिंदूत्व साम्राज्य,यु के बहुद्देशिय सामाजिक संस्था,आदर्श नवरात्र महोत्सव मंडळ,श्री विवेकानंद शक्तीप्रयोग तरुण मंडळ,श्री प्रतिष्ठान,पदमयुग प्रतिष्ठान,एस एस प्रतिष्ठान,मार्कंडेय युवा प्रतिष्ठान,जय मार्कंडेय बहुद्देशिय सामाजिक संस्था,जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ,पदम जल्लोष,श्री ओम साई प्रतिष्ठान,जयभवानी प्रतिष्ठान,हिंदू साम्राज्य,मातृ भूमी मित्र मंडळ,रावण साम्राज्य सामाजिक संस्था,महात्मा गांधी विणकर मित्र मंडळ,जय पदमशाली प्रतिष्ठान,एसपी अण्णा ग्रुप,बजरंग सेना, हिंदू बॉईज सामाजिक संस्था,श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ,रुद्राक्ष प्रतिष्ठान,श्री साई गणेश मित्र मंडळ,घरकुल प्रतिष्ठान,दत्तात्रय लेझीम संघ.

Tags: Jay markandeyaJubilationPadamsali community
Previous Post

लोकमंगल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मायलॅब या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड

Next Post

हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूरच्या विद्यार्थिनींनी सैनिकांना पाठवल्या राख्या

Next Post
हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूरच्या विद्यार्थिनींनी सैनिकांना पाठवल्या राख्या

हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूरच्या विद्यार्थिनींनी सैनिकांना पाठवल्या राख्या

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group