संतापलेल्या बापानेच केला पोटच्या पोराचा खून; व्यसनाधीन झाल्याने मुलाचा घेतला जीव

0
37

सांगली ( सुधीर गोखले) – जिल्ह्यातील मिरज शहरामध्ये आपल्या पोटच्या पोराचाच खून बापाने अत्यंत क्रूर पणे खून केल्याची खळबळजनक घटना आज मिरज मध्ये घडली मुलगा व्यसनाच्या आहारी गेल्याने बापाने संतापून कटर ने मुलाचा खून केला रोहित राजेंद्र हंडीफोड (वय २९ रा गणेश तलावाच्या पाठीमागे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर मुलाचा खून झाल्यानंतर वडील राजेंद्र यलाप्पा हंडीफोड( वय ५०) स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन खुनाची माहिती दिली.

गणेश तलावाच्या मागे हंडीफोड यांचा दूध विक्री चा व्यवसाय आहे मयत रोहित राजेंद्र हंडीफोड हा आपल्या वडलांना या व्यवसायात मदत करत होता. मात्र गेल्या कित्तेक महिन्यां पासून तो व्यसनापायी कर्जबाजारी होत चालला होता त्यामुळे भांडण व्हायची मयत रोहित हा दारूच्या आहारी गेला होता त्यात गुन्हागारी पार्श्वभूमी असलेल्या मित्रांच्या संगतीमुळे तो बिघडला होता रोज मयत रोहित घरी दारू पिऊन आला कि घरी वडिलांशी त्याचे भांडण व्हायचे.

आजही सकाळी मयत रोहित दारू पिऊन घरी आल्यावर वडिलांशी त्याचे भांडण झाले यावेळी वडलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्याच्या डोक्यात घरातील फावड्याने घाव घातले त्यातच तो मृत्यू पावला कटर ने त्याचे धडापासून हात पाय आणि डोके वेगळे केले आणि पोत्यात भरून ते पोते गणेश तलावात टाकले त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन पोलीस अधिकाऱ्यांना खुनाची कबुली दिली त्यानंतर सुभाषनगर येथील हंडीफोड यांच्या प्लॉट वर पोलिसांना रोहित याचा हात पाय नसलेला मृतदेह सापडला. अशा प्रकारे आपल्या पोटच्या पोराचा बापाने निर्दयी खून केल्याची दुर्दैवी घटना मिरज शहरामध्ये आज घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.