येस न्युज नेटवर्क : पंडीत कृष्णराव शंकर संगीत समारोहाचे निमंत्रण मध्यप्रदेश सरकार कडून पंडीत भिमण्णा जाधव मास्टर व्येकटेशकुमार यांना सुंद्रीवाद्य वादन करिता निमंत्रण आलेल्याची माहिती जागतीक कीर्तीचे सुंद्रीवादक पंडीत भिमण्णा जाधव यांनी दिली. पंडीत कृष्णराव शंकर संगीत समारोह मध्यप्रदेश शासन कडून आयोजित केलं जाते यद्याच्या वर्षी दि. 24 व 25 सप्टेंबर रोजी तानसेन कला विधिका ग्वालियर मध्यप्रदेश येथे दि.24 सप्टेंबर शंकर सगीत महाविद्यालय यांचे सामूहिक समूहगान, पंडीत विद्याधर व्यास यांचे शास्त्रीय गायन, पंडीत भिमण्णा जाधव व मास्टर व्येकटेशकुमार जाधव पिता पुत्र यांचे सुंद्री वादन होणार 25 सप्टेंबर श्री. प्रविण शेवलीकर यांचे व्हायोलीन वादन,पंडीत विनायक तोरवी यांचे शास्त्रीय गायन ग्वालियर येथे सपन्न होणार आहे.
पंडीत भिमण्णा जाधव हे सुंद्रीसम्राट पंडित सिद्राम जाधव यांचे नातू तर वडील पंडित चिदानंद जाधव यांचे चिरंजीव होय. वयाच्या 7 व्या वर्षी त्यांनी युवावाणी ऑल इंडिया रेडिओसाठी प्रसारक म्हणून सार्वजनिक पदार्पण केले सोलापूर सुंदरी हे दुर्मिळ आणि अद्वितीय वाद्य वाद्य आहे. ज्यांचे पालनपोषण शोधण्याचा आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केवळ जाधव कुटुंबापुरता मर्यादित नाही पंडित भीमण्णा यांनी या वाद्याचा भारताच्या सीमेपलीकडे गौरव केला आहे, त्यांनी फ्रान्स आणि बेल्जियममध्ये आपली कला सादर करून आपल्या कुटुंबाची स्वप्ने साकार केली आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स (ICCR) आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सुंद्री या दुर्मिळ वाद्याचा प्रचार आणि संकलन करण्याकरिता पंडीत भिमण्णा जाधव यांचे नांव स्वतंत्रपणे समाविष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने गुरु शिष्य परंपरा योजना दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि संगीत नाटक अकादमी ऑफ म्युझिक डान्स अँड ड्रामा यांच्या माध्यमातून अनेक शिष्यांना प्रशिक्षण दिले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या ऑल इंडिया रेडिओला सर्वोच्च श्रेणीतील टॉप कलाकार म्हणून भिमण्णा जाधव यांना मान्यता मिळाली आहे
आकाशवाणी संगीत संमेलनांतर्गत आणि परदेशात आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत अनेक प्रतिष्ठित संगीत मैफलीत सुंद्री वाद्य वादन सादर. आकाशवाणी प्रतीयोगिता स्पर्धा पुरस्कार पश्चिम बंगाल जदुभट्ट पुरस्कार समाजभूषण पुरस्कार गुजरात रत्न पुरस्कार,केंद्रीय संगीत नाटक अकादमी उस्ताद बिस्मिल्ला खा पुरस्कार 2007, उस्ताद अल्लाउद्दीन खा संगीत आणि कला प्रदेश अकादमी सांस्कृतिक परिषद भोपाळ उस्ताद लतीफ खान सन्मान 2019, कु.मास्टर व्येकटेंशकुमार भिमण्णा जाधव गुरुवर्य वडील पंडित भिमण्णा जाधव यांच्याकडून सुंद्री वाद्य वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. सुद्रीसम्राट पंडित सिद्राम जाधव यांचे परंतन्डु पंडित चिदानंद जाधव यांचे नातू जाधव घराण्याची 5वी पिढीतील कलाकार सुंद्रीसारख्या दुर्मिळ वाद्याचा प्रसार करताना कु.मास्टर व्येकटेंशकुमार आकाशवाणीने दूरदर्शन, भीमपलासी धारवाड, 85 अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन गुलबर्गा, सुरसिगार संस्था मुंबई, बाल गंधर्व संगीत महोत्सव सोलापूर, संगीत संजे बिजापूर,कलबुर्गी, कल्याण कर्नाटक फेस्टिव्हल,सगीत नाटक अकादेमी आयोजित वर्ल्ड म्युझिक डे फेस्टिव्हल दुर्मिळ समारोह नवी दिल्ली, सुंदरी सम्राट संगीत महोत्सव सोलापूर सगीतभूषण पंडीत राम मराठे सगीत महोत्सव ठाणे, रामकृष्ण आश्रम स्वामी विवेकानंद फेस्टिवल कोलकत्ता,आणि भारतातील विविध राज्ये अनेक म्युझिक वर्कशॉप्स म्युझिक फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला आहे, भारत सरकारचा मिनिस्ट्री ऑफ कल्चरल माध्यमातून संस्कृतीक स्तोत्र एवं प्रशिक्षण केंद्रचा दुर्मिळ वाद्या करिता भारतातून प्रथम स्कॉलरशिप अवॉर्ड, पदमविभूषण हरिप्रसाद चौरसिया राष्ट्रीय फेलोशिप सन्मान प्राप्त सद्या तो सोलापूर येथे दमाणी विद्या मंदिर सोलापूर येथे इ. 8 वी वर्गात शालेय शिक्षण पूर्ण करत आहे.