सोलापूर : सोलापूर शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये सोलापुर शहरात घर फोडीचे, चोरी, दरोडे असे प्रकार घडले होते, त्याबाबत विविध पोलीस ठाणेस गुन्हे दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त, सोलापूर शहर अंकुश शिंदे सो व पोलीस उपआयुक्त ( गुन्हे / विशा ) बापू बांगर, यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदरचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुखे, यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना गुन्ह्यांचा अभ्यास करून तसेच अभिलेखावरील आरोपी तपासून गुन्हे उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन केले होते.