सोलापूर : स्मार्ट सिटी चे चेअरमन असीम गुप्ता, आणि सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी जेष्ठ नगरसेवक युएन-बेरिया यांनी केले आहे. ते म्हणाले शहरांमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या अनेक कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. हे दोन्ही अधिकारी कुणाला जुमानत नाहीत. वेगवेगळी काम मंजूर होतात आणि रोखलीही जातात. उजनी ते सोलापूर दुसऱ्या लाईनचे काम असंच थांबवण्यात आलं आहे. हे का थांबलं ? हे जनतेला समजायला हवं आणि याला जबाबदार कोण हे ही समजायला हवं. यू एन बेरिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या मिळकत करातील पाच टक्के वाढीला तीव्र विरोध दर्शवला. वर्षाची पाणीपट्टी घेणाऱ्या महापालिकेने वर्षभरात शंभर दिवसही पाणी पुरवलं नाही. यामुळे पाणीपट्टीत 50 टक्के सूट द्यावी अशी ही मागणी बेरिया यांनी केली आहे. ते म्हणाले, दर चार वर्षांनी महापालिका अंतर्गत मिळकतीचे रिविजन झालं पाहिजे.
गेली 25 वर्ष हे रिविजन झालं नव्हतं. यामुळे महानगरपालिकेचा महसूल बुडाला आहे. अनेक घरांच्या नोंदी नाहीत. अनेक मिळकतदारांनी बिगर घरगुती व्यवसायासाठी आपल्या जागा दिल्या आहेत याच्या नोंदी पालिकेकडे नाहीत. या नोंदी झाल्या तर पाच टक्के कर वाढीची गरज भासणार नाही. सध्याचे महानगरपालिकेचे कराचे दर इतर महापालिकेच्या तुलनेत अधिक आहेत आणि ही नवी वाढ सोसणारी नाही. आपण या सर्व मागण्यांसाठी येत्या 9 जानेवारी रोजी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करणार आहोत. यात शहरातील नागरिक काळ्याफिती लावून सहभागी होतील असेही बेरिया यांनी सांगितलं.
रोटरी वतीने जयपूर फूट शिबिराचं आयोजन
सोलापूर दि। सोलापूर शहर रोटरी परिवाराच्यावतीने दिव्यांगणांना मोफत जयपुर फूट व कृत्रिम हात देण्याचं शिबिर आयोजित करण्यात आलं आहे.येत्या 6 आणि 7 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत इंडियन रेडक्रॉस सोसायटी दमानी ब्लड बँक डफरीन चौक येथे हे शिबिर होणार आहे. जवळपास 250 दिव्यांगणांना हात आणि पाय देण्याचं उद्दिष्ट आहे. या उपक्रमाला गती असं नाव देण्यात आलं आहे. शिबिरात लाभ घ्यायचा आहे त्यांनी रोटरी क्लब सदस्यांशी संपर्क साधावा अस आवाहन रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर निहार बुरटे यांनी पत्रकार परिषदेत केलं.यावेळी रोटरीचे अतुल सोनी, केदार कहाते,जयेश पटेल, धनश्री केळकर, राजन होरा, राहुल चंडक, अतुल चव्हाण, सचिन चौधरी ,अविनाश मठपती आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते शंभुलिंग शिवाचार्य यांच्या मराठी जीवन चरित्राचे प्रकाशन
सोलापूर दि येथील ज्योतिषाचार्य पंडित नीलकंठ परदेशी मठ यांनी अनुवाद केलेल्या कोण हे यतीवर या ग्रंथाचे प्रकाशन नुकतंच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं .यावेळी सोलापूरचे खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य उपस्थित होते. पंतप्रधानांनी हा चरित्र ग्रंथ पाहून आस्थेने माहिती घेतली आणि नीलकंठ परदेशी मठ यांना शुभेच्छा दिल्या. वयाच्या आठव्या वर्षी ऋग्वेद कंठस्थ असलेले विजय नगर साम्राज्याचे राजगुरू वंशात जन्मलेले श्री विद्यावाचस्पती श्री शभुलिंग शिवाचार्य यांचा हा जीवन चरित्र ग्रंथ आहे. त्यांचं कार्य म्हैसूर, काशी, अलाहाबाद, हंपी येथे झालं आहे. शंभू लिंग शिवाचार्य यांचे नातू नीलकंठ परदेशी यांनी मूळ कानडी भाषेतील या ग्रंथाचं मराठीत अनुवाद केला आहे. पत्रकार परिषदेस प्रकाशक मुद्रक ईश्वर झुंजा उपस्थित होते.