सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त इंद्रभवन आवारातील पुतळ्यास तसेच कौन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील यांची उपस्थिती होती. त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालायत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उद्यान प्रमुख रोहित माने, शकील शेख, पंडित वडतीले, सुरेश लिंगराज म्हेत्रे, खाटमोडे, अशोक खडके, सिद्धू तिमिगार, यल्लप्पा पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.