सोलापूर: जय भारत प्राथमिक शाळेमध्ये” ७८ वा स्वातंत्र्य दिन” जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत साबळे गुरुजी हे होते तर ध्वजारोहण नूतन खासदार सोलापूरचे बुलंद आवाज लोकप्रिय खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला तर प्रमुख अतिथी म्हणून सिद्राम फुले चेअरमन ,माननीय मारुती माळगे संस्थेचे सदस्य, माननीय दीपक फुले सरसंस्थेचे सचिव , चंद्रकांत साबळे गुरुजी , मारुती कुमार , राजा भंडारे, सिद्धराम पेदे साहेब, मनोज यल गुलवार सर, संस्थेच्या संस्थापिका शारदा फुले मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक नारायण सूर्यवंशी सर आदी मान्यवर उपस्थित होते.शिक्षक वृंद ,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे बापूजी नगर ,लष्कर, अलकुंटे चौक या परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली.
प्रभात फेरीमध्ये मुलांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम म्हणून परिसर दणाणून सोडला.त्यानंतर प्रभात फेरीनंतर माननीय कुमारी खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाला त्यानंतर अतिथी सत्कार करण्यात आला खासदार प्रणिती ताई शिंदे यांचा सत्कार संस्थेचे संस्थापिक शारदा फुले मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रणिती ताई यांनी आपल्या भाषणातून आपण देशाचे रक्षण केले पाहिजे संविधानाचा आदर केला पाहिजे. आपण सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र राहतो. देशच भेदभाव करत नाही तर आपण कोण,, आपण सुद्धा सर्वांनी एकत्र यायला पाहिजे एक जुटीने काम करायला पाहिजे कारण विद्यार्थी हे पुढच्या देशाचे भविष्यआहेत, एकता मध्ये शक्ती आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांना विद्यार्थी म्हणून आपले कर्तव्य बजावण्यास सांगितले. त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. इयत्ता बालवाडी ते सातवीच्या निवडक विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्या भाषणामध्ये इयत्ता सातवीतला विराज गायकवाड याचा प्रथम क्रमांक आला त्याला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम पारितोषक देण्यात आले.
त्यानंतर भारत आसादे इयत्ता सातवी या विद्यार्थ्यांचे हिंदी भाषनासाठी रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला, त्यानंतर इंग्रजी मधून प्रतीक्षा सुभाष म्हेत्रे याने आपले मनोगत व्यक्त केले .त्यानंतर हर्षवर्धन आयकोळे या विद्यार्थ्याने हिंदी मधून आपले मनोगत व्यक्त केले .इयत्ता बालवाडीतील संस्कृती भंडारे. ऋतुजा होसमणी, तनवी जुटलोळू या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले . इयत्ता सातवीच्या वर्ग शिक्षिका श्रुती फुले आणि त्यांच्या विद्यार्थी यांनी ए वतन वतन मेरे आबाद रहे तू हे गीत सादरीकरण केले सर्व विद्यार्थ्यांचे भाषणे झाल्यानंतर गेल्या वर्षीच्या सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट म्हणून गणित पेटी दिली.
प्रमुख अतिथी मान्यवरांना या शुभ दिनी देण्यात आले. त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी ,सुनो गौर से दुनियावालो , हे देशभक्तीपर गीत वर नृत्य सादर केले. का कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री फुले मॅडम यांनी केले .प्रास्ताविक कुविता लेंगरे मॅडम यांनी केले तर आभार रेश्मा म्हेत्रे मॅडमनी मानले.