सोलापूर ; लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर या पतसंस्थेच्या जुळे सोलापूर येथील 42 व्या शाखेचे उद्घाटन लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, संस्थेचे चेअरमन गुरण्णा आप्पाराव तेली, व्हा. चेअरमन निर्मला भागवत कुंभार आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी संचालक शहाजी साठे, संचालक युवराज गायकवाड, रेवणप्पा व्हनमाने, संचालक भीमाशंकर कलशेट्टी, संचालिका सरोजनी टिपे, संचालक सिद्राम देवकुळे, तज्ञ संचालक हरिश्चंद्र गवळी तसेच पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका अलका देवडकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक संचालक युवराज गायकवाड यांनी केले. सध्या संस्थेच्या आजअखेर एकूण 860 कोटी रु. च्या ठेवी आहेत , एकूण कर्जवाटप 607 कोटी असून एकूण व्यवसाय 1467 रु. कोटी असल्याचे सांगितले. रोहन देशमुख म्हणाले की, लोकमंगल पतसंस्था ही आपणा सारख्या ठेवीदार कर्जदार व सभासद खातेदारांनी ठेवलेल्या विश्वासावर तसेच कर्मचार्यांनी निष्ठेने केलेल्या कामावर उभी आहे. लोकमंगल पतसंस्था राज्यात पहिल्या 4 क्रमांका मध्ये आहे. आगामी काळात 1 क्रमांकावर आणण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे. यावेळी कार्यक्रमात जुळे सोलापूर शाखेचे प्रथम कर्जदार दीपक विभूते यांना कर्ज रक्कमेचा चेक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जुळे सोलापूर शाखेचे शाखाधिकारी सचिन हसापुरे व कर्मचारी उपस्थित होते, सूत्रसंचालन पतसंस्थेचे प्रशासकीय अधिकारी दत्तात्रय माळी यांनी केले व आभार प्रदर्शन किरण पोतदार यांनी केले.