सोलापूर : सोलापूर येथील एस.टी.स्टँड इन गेट येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या रिक्षा संघटनेच्या वतीने शाखेचे व वार्ताफलकाचा उद्घाटन सोहळा सुशील सरवदे हस्ते करण्यात आला.सर्व प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली,यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार रिक्षा स्टॉप शाखेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी बोलताना सुशील सरवदे म्हणाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रिक्षा संघटना जी कित्येक दिवसापासून दूरावली गेली होती ती आज तुमच्या सर्वांच्या सहकार्याने नव्या जोमाने सुरू करण्यात आली.त्याबद्दल रिक्षा संघटनेचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच पक्ष संघटन आपल्या माध्यमातुन वाढून लोकांची सेवा करावी.रिक्षा संघटनेच्या कोणत्याही अडीअडचणी मध्ये रिपब्लिकन पक्ष हा कायम तुमच्या मागे असेल असे आश्वासन दिले.

यावेळी शहर वाहतूक आघाडीचे अध्यक्ष महेश पवार, शिवम सोनकांबळे,रिक्षा स्टॉप शाखेचे अध्यक्ष सुदर्शनकांबळे अतुलरोकडे सनीमाने,विष्णू जाधव,
अभि क्षीरसागर,नागेश काई,मोतीराम भालेकर,समाधान डोलारे,आकाश कसबे,फय्याज अन्सारी,सतीश शिंदे,विनोद साळवे,शशीकांत जाधव,अरूण भालेकर,
सुनिल साबळे,विलास खंदारे,विजु पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेच्या सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.