अवंती नगर येथील लोकमंगल माध्यमिक प्रशालेत क्रिडा सप्ताह साजरा करण्यात आला या क्रिडा सप्ताहाचे उद्घाटन ज्ञान प्रबोधिनीचे सहकार्यवाह अमोल गांगजी व अवंती शिक्षण संस्थेचे सचिव प्रदीप साठे सर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून व रोप मल्लखांब च्या क्रीडांगणाचे पूजन करून करण्यात आले याप्रसंगी मुख्याध्यापिका शुभांगी साठे उपस्थित होत्या अवंती शिक्षण संस्थेचे सचिव प्रदीप साठे सर यांच्या हस्ते अमोल गांगजी रोहन घाडगे क्रीडा शिक्षक पी एस इंग्लिश मीडियम स्कूल व विरेश अंगडी क्रीडा शिक्षक सहीने प्रशाला यांचा सत्कार रोप देऊन करण्यात आला.
या क्रीडा सप्ताहात विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवले लगोरी क्रिकेट कबड्डी खो-खो असे विविध खेळ घेण्यात आले क्रीडा सप्ताहात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रदीप साठे सर यांच्या हस्ते करण्यात आला लोकमंगल समूहाचे अध्यक्ष सुभाष बापू देशमुख व कार्यकारी संचालक अभयसिंह साठे सर यांनी क्रीडा सप्ताहासाठी शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक रतिकांत म्हमाणे यांनी केले तर आभार राहुल कांबळे यांनी मानले.