सोलापुरातील एफ हिना बुटीकचे थाटात उद्घाटन

0
98

येस न्युज मराठी नेटवर्क : फॅशन डिझायनर सैपन इनामदार यांच्या एफ हिना बुटीक या ब्रायडल कलेक्शन असणाऱ्या प्रशस्त दालनाचा विविध सेलिब्रिटींच्या उपस्थितीत मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला

फॅशनच्या क्षेत्रात सोलापूर कराना ब्रायडल कलेक्शन सह अन्य लेटेस्ट व्हरायटी उपलब्ध करून देणाऱ्या एफ हिना बुटिकच्या कन्ना चौक परिसरातील दुसऱ्या शाखेचा विविध सेलिब्रिटींच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी मोठ्या जल्लोषात शुभारंभ करण्यात आला विविध ॲवॉर्डन या प्रसंगी सेलिब्रिटींचा गौरव देखील करण्यात आला संचालक फॅशन डिझायनर सैपन इनामदार, नावेद दलाल यांच्यासह मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती

एफ हिना बुटीकच्या शुभारंभा करिता सोशल मीडियावर प्रभावी सेलिब्रेटींची मोठी रेलचेल होती बाळीवेस परिसरातील ओ रियंट डीलाईट हॉटेल इथं या सेलिब्रिटींना त्यांच्या कार्याबद्दल एफ हिना बुटिकच्या वतीने सैपन इनामदार आणि नावेद दलाल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आल यावेळी फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती माध्यम क्षेत्रातील मंडळींचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला

दरम्यान या सेलिब्रिटींना पाहण्यासाठी त्यांच्या समवेत फोटो काढून घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती सोलापुरात येऊन मोठा आनंद झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या नंतर पार पडलेल्या मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते एफ हिना बुटीकच्या दालनाच मोठ्या जल्लोषात उद्घाटन करण्यात आल. या प्रसंगी दालनाची विशेष सजावट करण्यात आली होती सेलिब्रिटींनी दालनाची पाहणी करत गौरोद्गार काढले आपल्या मनोगतात संचालक सैपन इनामदार यांनी एफ हिना बुटिक हे युवक युवती आदींना एक पर्वणी असल्याचं म्हटल

दरम्यान उद्घाटन सोहळ्यावेळी क्राऊनिंग सेरेमनी देखील पार पडली स्वरा पवार तसच ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून आराध्या पवार यांचा सन्मान करण्यात आला सुकन्या आमने तसच श्रध्दा बिराजदार यांची यावेळी उपस्थिती होती

एकूणच मोठ्या थाटात एफ हिना बुटिकचा शुभारंभ करण्यात आला शुभेछा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मंडळींनी गर्दी केली होती