सोलापूर – सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन आज ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दोन दिवसीय चालणाऱ्या क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच महापालिकेला कधीही गरज भासल्यास त्यांना ही मैदान उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. सोलापूर महानगरपालिकेला मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचे आभार मानले.त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप, प्राचार्य राजू प्याटी,क्रीडा अधिकारी मुर्तुजा शहापुरे, विभागीय अधिकारी बाळासाहेब लामखाने, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन ताराळकर,पोलीस निरीक्षक आनंद काजुळकर,क्रीडा शिक्षक संघटना अध्यक्ष दशरथ गुरव, प्रकाश गायकवाड, सुनील चव्हाण, एकनाथ पवार, सुलोचना गवळी, रवी राठोड, संतोष म्हेत्रे, केतन माशाळ आदी उपस्थित होते.