सोलापूर : विकास सहकारी बॅंकेच्या संपूर्ण वातानुकूलीत मुख्य कार्यालय व शाखेच्या नूतन वास्तूचा निला नगर समोरील जागेत उदघाटन सोहळा प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी (आचार्यश्री किशोरजी व्यास) कोषाध्यक्ष श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या यांचे शुभहस्ते रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2020 विजयादशमीच्या पावन दिवशी संपन्न करण्यात आला.
यावेळी बॅंकेचे चेअरमन CA राजगोपाल मिणियार यांनी बॅंकेच्या प्रगतीची माहिती दिली. सन 1980 साली एका छोट्याश्या जागेत सुरू झालेली विकास बँक 40 वर्षाच्या काल खंडात एका वटवृक्षात विकसित झाली. बदलत्या बॅंकिंग सेवा प्रदान करण्यासाठी आज या भव्य नूतन वास्तूचा उदघाटन सोहळा पार पडला. याचवेळी संस्थापक अध्यक्ष श्री रामनिवास जाजू मीटिंग हॉलचे देखील उदघाटन स्वामीजींच्या शुभहस्ते करण्यात आले.
या वेळी प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी (आचार्यश्री किशोरजी व्यास) यांची श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रभू श्री रामचंद्राची चांदीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासास रू. 111000 ची देणगी देण्यात आली.
प. पू. आचार्यश्री यांनी बॅंकेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून विकास बँक ही आर्थिक विकासा बरोबर नैतिक व अध्यात्मिक विकासाचे अधिष्ठान असणारी बँक आहे अशा शब्दात गौरव केला.विकास बँकेने विश्वसनीयता, कार्यकुशलता व सचोटी या गोष्टींमुळे हा ग्राहकवर्ग जपला आहे.
प. पू. आचार्यश्रीचे स्वागत बॅंकेचे अध्यक्ष CA राजगोपाल मिणियार यांनी केले. सदर प्रसंगी आर्किटेक्ट श्री रोहन राठी, इंजिनियर श्री संजयजी तोष्णीवाल व नंदकिशोरजी मुंदडा यांचा सत्कार प. पू. आचार्यश्री यांच्या हस्ते करण्यात आला. बॅंकेचे उपाध्यक्ष श्री राजकुमार राठी यांनी आभार प्रदर्शन केले.
या प्रसंगी संचालक हरीनिवास जाजू, विजय कुमार राका, कमल किशोर राठी, राजगोपाल चंडक, ओमप्रकाश तिवाडी, नवनीत तोष्णीवाल, मनीष बलदवा, राजेंद्र कुमार आसावा, चंद्रशेखर स्वामी, रामकृष्ण पोरे, संचालिका साधना डागा, अनुराधा चांडक, कार्यलक्षी संचालक कमलेश सिंग, अरुण धनवे, बॅंकेचे व्यवस्थापक CA पांडुरंग मंत्री व बॅंकेचे अधिकारी उपस्थित होते.