सोलापूर : बॉम्बे पार्क रस्त्यावरील कॉम्प्लेक्स येथील ॲप्पेरेटर्स अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नवीन जागेत स्थलांतरित कार्यालयाचा उद्घाटन समारंभ गुरुवारी 29 जुलै रोजी सकाळी पार पडला.
उद्घाटन समारंभास नगरसेविका संगीता जाधव , लोकमंगल पतसंसंस्थेचे वसुली अधिकारी टाकळीकर आणि रेड्डी तसेच ए. जी. डिजिटल आर्टिस्ट कंपनीचे सीईओ नदीम जनवाडकर उपस्थित होते.त्यांनी ॲप्पेरेटर्स ॲप्लान्सेस कंपनीची माहितीहि दिली . याप्रसंगी संगीता जाधव यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन वृषाली गायकवाड यांनी केला . आभार अमोल साळुंके यांनी मानले.