- सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत दिनांक ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी शहरातील सर्व १५ नागरी आरोग्य केंद्रामध्ये महाआरोग्य शिबिर, महारक्तदान शिबीर तसेच “ जागरूक पालक,सुदृढ बालक” अभियानाचा शुभारंभ करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या मोहिमेचा शुभारंभ आयुक्त शीतल तेली-उगले यांचे शुभहस्ते कॅम्प प्रशाला, दक्षिण सदर बझार येथे करण्यात आला . सदर प्रसंगी उपायुक्त विद्या ह.पोळ, मा. आरोग्याधिकारी डॉ.बसवराज सं. लोहारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक तथा राज्य समन्वय अधिकारी डॉ. प्रदीप ढेले , माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.वैशाली शिरशेट्टी, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.अतिश बोराडे, शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे, दाराशा ना. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी वाळवेकर, बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.पी.कुलकर्णी, कॅम्प प्रशालेचे मुख्याध्यापक मुंडे तसेच प्रशालेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
- सदर प्रसंगी आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सोलापूर शहरवासीयांना आपली पालकत्वाची भूमिका जागरूकपणे पार पाडणेकरिता बालकांच्या निकोप वाढीकरिता नियमित आरोग्य तपासणी करावी. विशेषतः किशोरवयीन मुलींच्या आरोग्याकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष द्यावे. शासनातर्फे वेळोवेळी राबविण्यात येत असलेल्या आरोग्यविषयक अभियान ,नियमित लसीकरण सत्रे, विशेष लसीकरण मोहिमा यात सक्रीय सहभाग नोंदवावा. “ जागरूक पालक, सुदृढ बालक” या अभियानांतर्गत ० ते १८ वयोगटातील सर्व मुला-मुलींची विशेष तपासणी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांचे संयुक्त विद्यमाने येत्या ६० दिवसात करण्यात येणार आहे. या विशेष तपासणी मोहिमेत ०-६ वर्षे व ६ -१८ वर्षे असे वयोगट अंतर्भूत असून या दोन गटानुसार शाळा, महाविद्यालय, अनाथाश्रम, अंगणवाडी, सुधारगृहे तसेच कमी वयातील बालकांची घरी अथवा प्रसूतिगृहात मनपा आरोग्य पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. सदर तपासणी मोहिमेत नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे व आपल्या बालकांच्या आरोग्याविषयी सजग राहण्याचे आवाहन मा. आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले. तसेच गरज पडल्यास ज्या बालकांना विशेष उपचार अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अश्या बालकांना सोलापूर महानगरपालिके तर्फे मोफत इलाजाकरिता सहकार्य राहील असे आश्वासन दिले.
- सदर प्रसंगी मा.आरोग्याधिकारी यांनी सोलापूर मनपा आरोग्य विभागांतर्गत २५ तपासणी पथकामार्फत ० ते १८ वयोगटातील ८४३ शालेय आस्थापनांतर्गत एकूण २,१३९६५ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी पथकामार्फत आजारी असलेल्या बालकांना दर मंगळवारी व शुक्रवारी मनपाच्या मदर तेरेसा पॉलीक्लीनिक व चाकोते प्रसूतिगृह येथे बालरोगतज्ञांमार्फत संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. तसेच ज्या बालकांना शस्त्रक्रिया अथवा पुढील उपचार आवश्यक आहेत त्यांना श्री.छ.शि.म.सर्वोपचार रुग्णालयात दर शनिवारी संदर्भ सेवा देण्यात येणार आहे.
- “ जागरूक पालक,सुदृढ बालक” अभियानांतर्गत शहरातील एकूण ३७०६ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी १७३ बालकांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचे आजाराचे निदान करण्यात आलेले असून त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच बरोबर प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेस प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात येते. या अभियानाकरिता शहरातील खाजगी स्त्रीरोग तज्ञांमार्फत मनपा नागरी आरोग्य केंद्रात तपासणी करिता येणाऱ्या गरोदर मातांची विशेष व मोफत तपासणी करण्यात येत असते. या अभियानाअंतर्गत आज दि.९ फेब्रुवारी रोजी शहरातील ३७० गरोदर मातांची तपासणी करण्यात आली.
- सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत दिनांक ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी शहरातील सर्व १५ नागरी आरोग्य केंद्रामध्ये महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये मोफत तपासणी व उपचाराचा शहरातील एकूण २०९० नागरिकांनी लाभ घेतला. तसेच महारक्तदान शिबिरामध्ये एकूण ५६ दात्यांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले. दाराशा नागरी आरोग्य केंद्र येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन तसेच “ जागरूक पालक,सुदृढ बालक” या मोहिमेचा शुभारंभ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रणितीताई शिंदे यांचे हस्ते करण्यात आला. शेळगी नागरी आरोग्य केंद्र येथील महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन तसेच “ जागरूक पालक,सुदृढ बालक” या मोहिमेचा शुभारंभ सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांचे हस्ते करण्यात आला.
“सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना या “ जागरूक पालक,सुदृढ बालक” अभियानांतर्गत आपल्या शाळेत जाणाऱ्या बालकाची तपासणी शाळेत येणाऱ्या वैद्यकीय पथकामार्फत व शाळाबाह्य मुलांची तपासणी आपल्या घरी येणाऱ्या वैद्यकीय पथकामार्फत करून घेण्यात यावी” असे आवाहन मा. आयुक्त शीतल तेली-उगले यांचे मार्फत करण्यात येत आहे. जागरूक पालक,सुदृढ बालक” एकूण लाभार्थी – ३७०६ संदर्भ सेवा देण्यात आलेले लाभार्थी – १७३ . प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान लाभार्थी – ३७० , महाआरोग्य शिबिर एकूण लाभार्थी – २०९०, संदर्भ सेवा देण्यात आलेले लाभार्थी – ३८, महारक्तदान शिबीर – ५६