येस न्युज मराठी नेटवर्क : गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून तेथील नागरिक वास्तवास राहात असून व सोलापूर महानगरपालिकेला नियमितपणे टॅक्स भरत आहे परंतु तेथे कुठल्याच सुविधा नसल्यामुळे तेथील नागरिक त्रस्त होते त्यांनी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांना सदर बाब निदर्शनास आणून देऊन निवेदन दिले होते त्याची दखल घेत 19-20 नगरोत्थान योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली या वेळी तेथील नागरिक यांनी सांगितले की प्रत्येक वेळी मागील काळात प्रत्येक नगरसेवक फक्त निवडणूक पुरताच येत होता व निवडून गेल्यानंतर परत तिकडे फिरकत नव्हता परंतु नगरसेविका सौ राजश्री चव्हाण तसे न करता जातीने लक्ष घालून पाठपुरावा करून सदर नगरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावले असे सांगितले.
प्रथम तेथील नगरातील नागरिक यांनी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्यावेळी समाज सेवक परमेश्वर माळगे, चंद्रकांत को ठाणे, मौला कोरबु, चंद्रकांत चलवादी, नागनाथ शिंदे, सिद्धाराम ईश्वरकट्टी, नीलकंठया स्वामी, आशुतोष माने, रवींद्र देशपांडे, शरणाप्पा फुलारी, हत्तर्गी सर, सुभाष सिंग खैरनार, सुरेश चोपदार, गिरीश पतंगे, मल्लिकार्जुन जाधव,दीपक सोनावणे, आधी उपस्थित राहून केले कार्याचा आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.