बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून बांधकामासाठी वापरला जाणारा मोठा दगड खाली पडून अपघात घडला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून बांधकामासाठी वापरला जाणारा मोठा दगड खाली पडून अपघात घडला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. ही घटना मुंबईतील वरळी परिसरात घडली आहे. तसेच या परिसरातील अनेक वाहनांवर देखील दगड पडल्याची घटना देखील घडली आहे. साबीर अली (वय 36) आणि इम्रान अली खान (वय 30) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
अपघातत मृत्यू झालेले दोघेही रस्त्यावरून जात होते. त्यावेळी अचानक इमारतीच्या 42 व्या मजल्यावरुन दगड खाली कोसळला. यात ते दोघेही जखमी झाले होते. दुर्घटनेनंतर बसाच वेळ हे दोघेही गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
वरळी परिसरातच 9 जानेवारीलाही झाला होता अपघात
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरुन दगड पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. दगडाखाली बदल्यानं मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, 9 जानेवारी रोजी मुंबईतील वरळी परिसरात लिफ्टला अपघात झाल्याची घटना समोर आली होती. ही घटना वरळीच्या अवघना टॉवर परिसरात घडली होती. या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टचा अपघात झाला होता. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या परिसरात आता अपघाताची दुसरी घटना घडली आहे.