सोलापूर,- प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमात येत्या शिक्षकदिनी म्हणजे गुरूवार, ५ सप्टेंबर रोजी प्रा. डॉ. गीता नरेंद्र जोशी यांच्या ‘आहे कसा तो आननी’ या कथासंग्रहातील कथांचे व “बहावा” मधील काही कवितांचं अभिवाचन अभिवाचन होणार आहे.तसेच याच कार्यक्रमात डॉ. गीता जोशी यांची प्रकट मुलाखत शिरीष देखणे घेणार आहेत.
डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सायंकाळी ६.२५ वाजता हा कार्यक्रम होईल. डॉ. गीता जोशी सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत. तब्बल ३२ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव गाठीशी आहे. ‘लेणे प्रतिभेचे’ हा समीक्षा ग्रंथ, डोकं शाबूत आहे ही कादंबरी’ आहे कसा तो आननी’ हा कथासंग्रह, ‘बहावा’ हा कवितासंग्रह अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. शिवाय विविध वृत्तपत्रांतून समीक्षा लेखन, स्तंभलेखन असे विपुल वैचारिक आणि ललित लेखन त्यांनी केले आहे.
प्रिसिजन वाचन अभियानाची सुरवात जुलै महिन्यात झाली. प्रिसिजन वाचन अभियान अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाचकांसाठी नवीन पर्वणी घेऊन येत आहोत. वाचकांना नविन काही तरी ऐकायला व वाचलायला मिळेल या दृष्टीकोनातून हा उपक्रम राबवित आहोत. यामुळेच सोलापूरकर वाचक, रसिक प्रेक्षकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला, प्रिसिजन वाचन अभियानमध्ये त्यांच्या ‘आहे कसा तो आननी’ या कथासंग्रहातील काही कथा, ‘बहावा’ मधील काही कवितांचे अभिवाचन करणार आहेत धनंजय गोडबोले, अशोक किल्लेदार आणि विद्या लिमये. याच कार्यक्रमात डॉ. गीता जोशी यांची प्रकट मुलाखत शिरीष देखणे घेणार आहेत.