करमाळा- जिल्ह्यात हजार मुलामागे फक्त ९२१ मुली आहेत. राज्याच्या सरासरीमध्ये सोलापूर जिल्हा खुप मागे आहे. मुलींची संख्यावाढ चिंताजनकआहे. यासाठी मुलींना सन्मान द्या असे सांगत “बेटी बचाव व बेटी पढाव” कार्यक्रमात सिईओ दिलीप स्वामी यांनी करमाळा तालुक्यांतील फिसरे गावात पार पडलेल्या कार्यक्रमात सृष्टी पाटील या बालिकेस अध्यक्षपदाचा मान दिला. मुलांना सन्मान द्या असा संदेश सिईओ दिलीप स्वामी यांनी या कार्यक्रमातून दिला.
- करमाळा तालुक्यांतील फिसरे येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्तर २ अंतर्गत युवा स्वच्छतादूत शिबीराचे आयोजन करणेत आले होते. या समारोप समारंभास उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, गटविकास अधिकारी मनोज राऊत, डाॅक्टर पिंपळे, उपप्राचार्य किरदाट, कार्यक्रम अधिकारी नवनाथ राख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सरपंच प्रदीप दौंडे , उप सरपंच विजय औताडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मण राख, माजी उपसरपंच संदीप नेटके, पाणी फौडंशनचे प्रतिक गुरव उपस्थित होते. ग्रामसेवक दादासाहेब केवारे व रासेयो जिल्हा समन्वयक लक्ष्मण राख व दोन स्वयंसेवकांचा यावेळी गौरव करणेत आला. अध्यक्षपदाची मान दिलेले सृष्ट्री पाटील या बालिकेचा देखील गौरव करणेत आला. अंगणवाडी सैनिकांनी एकांकिका सादर करून डोळ्यात झणझणीत अंजन घालून मुलींचा टक्के वाढविण्याचे आवाहन केले. याबेळी दोन मुली असणाऱ्या पालकांचा गौरव करणेत आला.
- यावेळी बोलताना सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, विकास कामात राजकारण आणू नका. चांगले काम होणेसाठी सेवेची सवय महत्वपुर्ण आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माध्यमातून स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविणेत येत आहेत. शासनास स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तीक शौचालय तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शौषखड्डे घेणेसाठी शासनास पुढाकार घ्यावा लागतो, आदी उपक्रम राबविणेत येत असल्याचे सिईओ स्वामी यांनी सांगितले. या शिबीराच्या माध्यमातून “नो नाॅलेज विदाऊट काॅलेज” हि संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी म्हंटले.
- वेळेचे महत्व लक्षात घ्या
महाविद्यालयीन जिवनात वेळेचे महत्व खुप आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेला महत्व देऊन आपल्या भविष्याकडे वाटचाल करणे महत्वाचे आहे.
- माझ्या दोन मुली माझा अभिमान-
सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, मला पण फक्त दोन मुली आहेत. दोन मुलींनंतर मी कुटूंब नियोजन केले आहे. मुलींना शिकवा. मुलींना वाढवा. बेटी बचाव बेटी पढाव भिंतीवर लिहून होणार नाही. तर त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यात करणे गरजेचे आहे.
- सायकल बॅंकेत ३ हजार सायकली !
सोलापूर जिल्ह्यात सायकल बॅंकेत ३ हजार सायकली आहेत. अद्याप साडेतीन हजार मुली सायकलींविना आहेत. सायकल बॅंकेसाठी खुप प्रतिसाद मिळत आहे.
- जलजीवन मिशन ची कामे वेळेत पुर्ण करा –
जलजीवन मिशन अंतर्गत फिसरे गावास ७० लक्ष रूपये मंजूर झाले आहेत. या योजनेची निविदा प्रक्रिया पुर्ण होत आहे. ही योजना वेळेत पुर्ण करा. कामे चांगल्या दर्जाची होतील याकडे लक्ष द्या. “हर घर नल से जल” या अभियानातून प्रत्येक घरास नळ कनेक्शन द्या असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी यावेळी केले.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांनी जिल्हयात बेटी बचाव बेटी पढाओ अभियान प्रभावी पण राबविणेत येत असल्याचे सांगितले.
बेटी बचाव या बाबत गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी आशा क्लिनीक ची सोय प्रत्येक गावात सोय करणेत आली आहे. या आशा क्लिनिकमध्ये असणारे आशांना डिजीटल थर्मामीटर, गोळ्यांचे कीट, नेबूलायजर, आॅक्सीमिटर , वेगवेगळे वस्तुंचे किट देणेत येत आहे. गावात एक खोली आशा क्लनिक साठी उपलब्ध करून देणेत येत असल्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले. ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांना आकाशी रंगांचा युनिफाॅर्म देणेत आलेला आहे. तालुक्यांतील सर्व कर्मचारी युनिफार्ममध्ये असणार आहेत. राज्यातील एखाद्या पंचायत समितीअंतर्गत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये एकाच रंगात युनिफार्म असलेला करमाळा हा एकमेव तालुका असणार आहे. असेही गटविकास अधिकारी राऊत यांनी सांगितले.
माजी उपसरपंच संदीप नेटके,यांनी मनोगत व्यक्त केले.
गटविकास अधिकारी राऊत यांचा करमाळा पॅटर्न …!
आशा क्लनिक ची नवी आशा ….!
ग्रामपंचायत कर्मचारी यांना कार्पोरेट कंपनीतील कर्मचारी यांचे प्रमाणे आकाशी कलरचा ड्रेस तर आशा चा चांगला उपयोग करमाळा तालुक्यांत केले आहे. नवी दिल्लीत ज्याप्रमाणे मोहल्ला क्लिनिकची स्थापना झाली त्या धर्तीवर करमाळा तालुक्यात प्रत्येक गावात आशा क्लनिक सुरू करून करमाळा पॅटर्न सुरू ठेवला आहे. २२० ग्रामपंचायत कर्मचारी यांना ड्रेस कोड दिला आहे. सिईओ स्वामी यांनी या नाविण्यपुर्ण उपक्रमाबद्दल कौतुक केले.
सिईओ व बालिकांची बैलगाडीतून मिरवणूक
सिईओ दिलीप स्वामी यांनी “मुली वाचवा मुली शिकवा” या अभियान अंतर्गत मुलींची सिईओ दिलीप स्वामी, जिल्हा प्रकल्प अधिकारी जावेद शेख व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे सह गावातून बैलगाडीतून मिरवणूक काढत गावात मुली वाचवा व मुली शिकवा यांचा संदेश देणेत आला. वाजत गाजत मुली वाचवा अभियानाचा जागर करणेत आला.