सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 चा मंगळवार दिनांक ८ जून चा अहवाल प्राप्त झाला आहे. सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात नव्याने ३५७ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे . या कालावधीत ६८१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. तसेच २० जण मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाबाधित नवीन रुग्णांचा आढावा घेतला असता माळशिरस तालुक्यात सर्वाधिक ८० रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. सर्वात कमी रुग्ण उत्तर सोलापूर तालुक्यात अवघे ४ आहेत.