पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ३ वर्षाची शिक्षा; जेलमध्ये रवानगी

0
24

येस न्युज नेटवर्क : पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली (तोषखाना केस) तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्लामाबादमधील एका न्यायालयाने त्याला सरकारी भेटवस्तू विकून कमावलेले पैसे जाहीर न केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. इम्रान खान यांनी आरोप फेटाळले असून त्यांनी या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. न्यायाधीशांनी त्यांच्या तत्काळ अटकेचे आदेश दिले आहेत. इम्रान खान यांना लाहोरमधील त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना अटक करून कोट लखपत जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा त्यांची जेलमध्ये रवानगी झाली आहे.

“इम्रान खान चोर है” अशी घोषणाबाजी
इम्रान खान 2018 मध्ये निवडून आले होते. परंतु, गेल्यावर्षी अविश्वास ठरावात त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. न्यायालयाचा निर्णय जाहीर होताच, काही फिर्यादी वकिलांचा समावेश असलेल्या जमावाने न्यायायलाच्या इमारतीबाहेर “इम्रान खान चोर है” अशी घोषणाबाजी सुरू केली. मे महिन्यात खान यांना विनंती करूनही कोर्टात हजर न राहिल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्यानंतर अटक बेकायदेशीर घोषित करून सुप्रीम कोर्टाकडून त्यांची सुटका करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांच्या पक्षावर चांगलाच राजकीय दबाव आहे.