करमाळा – ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान प्रभावीपणे राबवा असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले करमाळा पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये आज ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियानानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते याप्रसंगी गटविकास अधिकारी मनोज राऊत सदर कार्यक्रमाला गट विकास अधिकारी मनोज राऊत सहाय्यक गट अधिकारी राजाराम भोग पाणीपुरवठा उप अभियंता अजित वाघमारे , बांधकाम उप अभियंता डीपी गौंडरे या प्रसंगी उपस्थित होते. आज मा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपजी स्वामी साहेब यांच्या हस्ते ग्रामपंचायत सक्षमीकरण कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी दप्तर अद्ययावत कॅम्प मधील 100% दप्तर पूर्ण करणाऱ्या ग्रामसेवकांना सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांना गणवेश देण्यात आला. आपले सरकार केंद्र ऑपरेटर याना टी शर्ट वाटप करण्यात आले. सांस अभियान अंतर्गत डॉक्टरांना नेब्युलायसर वाटप करण्यात आले. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत च्या QR code चे उद्घाटन करून डिजिटल पेमेंट सिईओ स्वामी यांचे हस्ते सुरू करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान प्रभावी पणे राबविलेस गावाचा विकासाला दिशा देणेस मदत होणार आहे. ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियानात उत्कृष्ठ काम करणारे ग्रामसेवक यांचा जिल्हा स्तरावर गौरव करणेत येणार आहे. उत्कृष्ठ कामांची सेवा पुस्तकात नोंद घेणेत येणार आहे. ज्या ग्रामपंचायती या अभियानात चांगले काम करणार नाहीत या ग्रामपंचायतींचा विचार केला जाईल. संबंधित ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस देऊन विचारणा केली जाईल.
सक्षमीकरण अभियानात माझी वसुंधरा, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, स्मार्ट ग्राम, यशवंत पंचायत राज अभियान, संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान, असे विविध घटक पुर्ण होतात. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
सायन्स वाॅल नाविण्य पुर्ण उपक्रम उत्कृष्ठ – सिईओ दिलीप स्वामी
करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मनावर घेऊन सायन्स वाॅल या सारखा नाविण्यपुर्ण उपक्रम राबविला. या उपक्रमाची दखल लोकसभेत घेणेत आली. गावातील रस्त्यांना शास्त्रज्ञांची नावे देण्यात आली. विद्यार्थ्यांवर यामुळे वैज्ञानिक संस्कार होणेस मदत होणार आहे. या प्रमाणे ग्रामसेवक यांनी स्वत ची कल्पना शक्ती राबवून नाविण्यपुर्ण उपक्रम राबवावेत. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी तालुक्यांतील राबविणेत येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन जिल्ह्सात करमाळा तालुका सर्व निकषामध्ये आघाडीवर राहिल असा विश्वास दिला. उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी याबाबत नियोजन सांगितले आहे. याबाबतची सक्षमीकरण अभियानाची माहिती पुस्तिका सर्व ग्रामपंचायत यांना देणेत आली आहे. असेही बिडीओ राऊत यांनी सांगितले.
सर्व विस्तार अधिकारी पंचायत , स्वच्छता विभागातील उमेश येळवणे मीना राखुंडे ग्रामसेवक ऑपरेटर सम विभागातील गणेश गवळी यांनी कार्यशाळा यशस्वी करणे साठी प्रयत्न केले.