मी भाजपची आहे, पण भाजप माझा एकट्याचा पक्ष नाही : पंकजा मुंडे

0
34

येस न्युज नेटवर्क : राष्ट्रीय समाज पक्षाने बुधवारी दिल्लीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली. दरम्यान याच कार्यक्रमाच्या भाषणामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्या म्हणाल्या, मी भाजपची आहे, पण भाजप थोडाच माझा एकट्याच पक्ष आहे. महादेव जानकरांचा स्वतःचा पक्ष आहे तसा भाजप कुणी एकट्याचा नाही, ही पक्ष खूप मोठा आहे, मी त्याची एक कार्यकर्ती आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्याचे आता वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढले जात असून, यावर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे.

पंकजा मुंडेंच्या अगोदर महादेव जानकरांचे भाषण झाले. त्यावेळी जानकर पंकजा मुंडेना भाजप हा वारंवार तुमचा पक्ष असे म्हणत होते त्यावर भाष्य करताना पंकजा मुंडेंनी वक्तव्य केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे. पंकजाताई भाजप माझ्या पाठिशी आहे, असंच म्हणाल्या, असं बावनकुळे म्हणाले