मी बंडखोर नाही, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला इशारा

0
8

नवी दिल्ली : मला सतत बंडखोर म्हटले जात आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे भक्त आणि शिवसैनिक आहोत. सध्या माझ्यासोबत 46 आमदार असून, ही संख्या आणखी वाढेल, असा दावाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी फोनवरून संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

आम्ही सर्व आमदार बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या हिंदुत्वाच्या शिकवणीने पुढे जात आहोत. कडवट हिंदुत्वाची भूमिका आम्ही सगळे आमदार पुढे घेऊ जात आहोत. आम्ही सगळेच बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असून, अद्यापही आम्ही शिवसेना सोडलेली नाही. तसेच यापुढेही शिवसेना सोडण्याचा विचार नाही. बाळासाहेबांनी देशाला दिलेला हिंदुत्वाचा विषय आम्ही पुढे घेऊन जाणार असल्याचा निर्धारही एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवला.