येस न्यूज मराठीच्या वतीने सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात गुरुवारी सायंकाळी आयोजित केलेल्या रिमझिम गिरे सावन या हिंदी – मराठी गाण्याच्या मैफिलीला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रायझिंग स्टार फेम अभिषेक सराफ आणि कल्याणी देशपांडे यांनी गायलेल्या विविध गाण्यांवर रसिकांनी टाळ्यांचा पाऊस पाडला.
या कार्यक्रमाचे प्लॅटिनम मॉल हे मुख्य प्रायोजक तर हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह आणि होमकर रियालिटी हे सहप्रायोजक होते. दिव्य मराठी हे या कार्यक्रमाचे प्रिंट मीडिया पार्टनर होते.
प्रारंभी इंद्रधनुचे गणेश कोळी, चित्रा एक्झिक्युटिव्ह चे धीरज जवळकर, होमकर रियालिटीचे कृष्णा होमकर, गिरीश दर्बी, येस न्युज मराठीचे शिवाजी सुरवसे, गीतांजली सुरवसे, गायक अभिषेक सराफ, कल्याणी देशपांडे, आर जे. बंड्या, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ऐश्वर्या हिबारे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या प्रायोजकांचा येस न्यूज मराठी च्या वतीने सत्कार करण्यात आला. डायव्हिंग जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी हिचा अभिषेक सराफ, गणेश कोळी, रूपाली कोळी, यश दर्बी आदींच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
लय भारी माझा गणपती बाप्पा गाण्याने अभिषेक सराफ यांनी मैफिलीला सुरुवात केली .. अधीर मन झाले.. रिमझिम गिरे.. सावन ये राते ये मौसम.. ही गुलाबी हवा.. मन उधाण वाऱ्याचे.. हिरवा निसर्ग.. ये हसी वादिया.. भीगी भीगी रातो मे.. अशी एकाहून एक सरस हिंदी- मराठी गाणी यावेळी सादर झाली. कल्याणी देशपांडे हिने गायलेल्या चंद्रा या लावणीला टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद मिळाली.
अर्जित सिंग यांच्या गाण्याचा मॅशप अभिषेक सराफ यांनी सादर करताना मोबाईल मधील टॉर्च लावून श्रोत्यांनी उस्फूर्त दाद दिली.मेरे ढोलना सुन… मेरे प्यार की धुन या जबरदस्त गाण्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. आर जे बंड्या यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करून मैफिलीमध्ये रंग भरले . स्टार्स ऑफ मेलोडीचे जब्बार शेख आणि धनंजय यांनी कार्यक्रमाला साथसंगत केली.













