सोलापूर : अखिल भाविक वारकरी मंडळ सोलापूर महिला समितीचे माध्यमातुन सोलापूर शहर व जिल्ह्यातील महिलांचे संघटन करण्यासाठी, महिलांचा वारकरी परंपरेत सहभाग वाढण्यासाठी , विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी महिला वारकरी मेळावा घेण्यात आला होता.
या वारकरी महिला मेळावा राष्ट्रिय अध्यक्ष ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. पोलिस उपायुक्त दिपाली काळे, नागनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती. हा मेळावा शनिवार दि. 07-जानेवारी रोजी सकाळी निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडला.
महिलांनी कुटुंब सांभाळत भजन करणे खूप कठीण असून सुद्धा श्रध्देने करतात हे कौतुकास्पद आहे असे उद्गार दिपाली काळे पोलिस उपायुक्त यांनी यावेळी काढले. सोलापूर शहर जिल्ह्यातील वारकरी महिलांचं संघटन व्हावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे असे मत राष्ट्रिय अध्यक्ष ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांनी व्यक्त केले. महिला शहर अध्यक्ष वैशाली वैशाली वळसंगकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
हा मेळावा यशस्वी करणेसाठी शहर उपाध्यक्ष नंदा बेलेराव , जिल्हा उपाध्यक्ष मंगल दीक्षित , शहर उपाध्यक्ष जनाबाई निकम , जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी शेळके, विभाग अध्यक्ष महानंदा पांढरे ,लता पाठक , मीरा बोंगे , शहर संघटक अनिता तंबाके, रोहिणी राऊत, इ. पदाधिकारी महिला परिश्रम घेतले. तर प्रिया धर्माधिकारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.