अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील हत्तीकणबस येथे अक्कलकोटचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन दादा कल्याणशेट्टी प्रचार बैठकीला उपस्थित राहत त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. गेल्या 5 वर्षात मोठ्या प्रमाणात निधी आणून गावाचा चेहार मोहरा बदलण्याचा प्रयत्न आमदार या नात्याने मी केला. गावाचा विकास पाहून भाजप-महायुतीच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे यासाठी ग्रामस्थांना विनंती त्यांनी केली.
हत्तीकणबस गावात अंतर्गत बंदिस्ट गटार बांधणे, गाव अंतर्गत सिमेंट रस्ता करणे, नंदर्गी प्लॉट ते शरणप्पा अंबुलगे घरापर्यत सिमेंट रस्ता करणे, बिरलिंगेश्वर मंदिरजवळ धनगर समाज स्मशानभुमीस संरक्षक भिंत बांधणे, आंबेडकर नगर येथे पेव्हिंग ब्लॉक रस्ता करणे, आंबेडकर नगर येथे अंतर्गत सिमेंट रस्ता करणे, आंबेडकर नगर येथे भुमीगत गटार करणे, नवीन अंगणवाडी बांधकाम क्र. 98, नाला खोलीकरण व सरळीकरण करणे, शंकरलिंग मंदिरसमोर बंदिस्त गटार करणे, यल्लामा आणि रेणुका मंदिर येथे सभागृह बांधणे, हत्तीकणबस ते मिरजगी मध्ये रस्ता सुधारणा करणे, जल जीवन आणि अंतर्गत नळ पाणी पुरवठा सोय करणे, बिरलिंगेश्वर मंदिरासमोरील सभामंडप भोवती संरक्षक भिंत बांधणे, गणपती कट्टा येथे सभामंडप बांधणे, भिमनगर येथील मरिआई मंदिरासमोर सभामंडप बांधणे, जि.प.शाळेस संरक्षक भिंत बांधणे, हत्तीकणबस ते बणजगोळ रस्ता सुधारणा करणे अशी भरपूर कामे झाली आहेत.
यावेळी मोतीराम राठोड, सिद्धाराम बाके, श्रीशैल नंदर्गी, देवप्पा बिराजदार, अणप्पा बिराजदार, धूळप्पा बिराजदार, बसवराज बिराजदार, सिद्रामप्पा दोड्याळे, हणमंत बिराजदार, गुरू उन्नद, श्रीशैल माळी, बाबूराव हिरापुरे, राजकुमार झिंगाडे, अमोल पुटगे आदीसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.