अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद नागरिकांचे मात्र हेलपाटे
सांगली (सुधीर गोखले) : सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा अनागोंदी आभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय आला मनपा कुपवाड विभागीय कार्यालयामध्ये नगररचना विभागाला वालीच कोण नाही अशी अवस्था सध्या आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून येथील गुंठे वारी विभागामध्ये अविनाश बने यांची नुकतीच बदली झाली होती पण ते हजर झाल्यानंतर वैद्यकीय रजेवर गेल्यापासून नुकतेच काल परत आले आणि आज परत ते दिसेनासे झाले तसेच त्यांचा दूरध्वनी सुद्धा बंद लागत आहे नागरिक मात्र इकडे हेलपाटे घालून थकले आहेत पण त्याची परवा कोण करते अधिकाऱ्यांना वेळेत पगार मिळाला की त्यांचे काम संपले.
काही दिवसांपूर्वी सांगली महापालिकेमधील नगररचना कार्यालयाची उपायुक्त राहुल रोकडे यांनी नागरिकांच्या तक्रारीवरून झाडाझडती घेतली होती आणि सांगली आणि मिरजेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या होत्या त्यामधे कुपवाड विभागीय कार्यालयात गुंठेवारी विभागात अविनाश बने यांची बदली झाली आहे मात्र ते रजेवर केल्यानंतर मोबाईल बंद ठेवल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तसेच अविनाश बने रजे वरून हजर झाल्यानंतर ही आज त्यांचा मोबाईल बंद लागत आहे कारण मात्र गुदस्त्यात आहे. मात्र नागरिकांना याचा त्रास होत आहे