सोलापूर : मराठा सेवा संघाच्यावतीने ३ जानेवारी ते १२ जानेवारी या दरम्यान जिजाऊ – सावित्री दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते याची सांगता सर्व क्षेत्रातील महीलांचा सन्मान करुन करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील होते. घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचाराची तरुण पिढी निर्माण होण्यासाठी महिलांनी राजमाता जिजाऊचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन संस्कारक्षमपिढी घडवावी असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष उज्वला साळुंखे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले.
मराठा सेवा संघाच्या कार्यालयात जिजाऊ जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. . याप्रसंगी विचारपिठावर जिजाऊ ब्रिगेडच्या विभागिय अध्यक्ष निर्मला शेळवणे, जिल्हा अध्यक्ष उज्वला साळुंखे, सुनिता पाटील , लता ढेरे, प्रियांका डोंगरे, शहर अध्यक्ष सदाशिव पवार, खजिनदार आर. पी. पाटील, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष जीवन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणार्या महिलांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रारंभी राष्ट्रमात जिजाऊना अभिवादन करण्यात आले त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. हा कार्यक्रमयशस्वी करण्यासाठी महिला शिक्षक आघाडी शहर प्रमुख शुभांगी निंबाळकर , अभिंजली जाधव, लता ढेरे, प्रियांका डोंगरे, कल्याण गव्हाणे, गोवर्धन गुंड, हणमंत पवार, प्रतिज्ञा भोसले, नितिन जाधव,दिपक शेळके,बब्रुवाहन गुंड इत्यादी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जीवन यादव यांनी केले. तर आभार सदाशिव पवार सर यांनी मानले.