No Result
View All Result
- सोलापूर – सोलापूर जिल्हा पेन्शनर्सअसोसिएशनच्या पन्नास वर्षातील कारकिर्दीनिमित्त छाया प्रकाश फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने पेन्शनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या दालनात हा सत्कार कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायत व प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सदाशिव उंब्रजकर यांना वृक्ष देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
- यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे,लेखाधिकारी कैलास कुंभार, लेखाधिकारी चंद्रकांत पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सोलापूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष जी. टी. जाधव, कार्याध्यक्ष नारायण साळुंखे, यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
- सोलापूर जिल्हा पेन्शन असोसिएशनला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत 1970 रोजी नोंदणी झालेल्या या संस्थेने सोलापूर जिल्ह्या मधील अनेक पेन्शनच्या अडचणी सोडवण्याचे काम केलेला आहे या त्यांच्या कार्याबद्दल छाया प्रकाश फाउंडेशनच्या वतीने त्यांना नुकताच 75 हजार रुपये रोख व मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अर्थ विभागाचे वतीने संस्थेच्या पदाधिकारी यांचा वृक्ष भेट देऊन गौरव करणेत आला.
- जिल्हा परिषदेचा अर्थ विभागाचे चांगले सहकार्य – अध्यक्ष – उंब्रजकर
जिल्हा परिषदे च्या अर्थ विभागात पेन्शनर्स ची प्रकरणे व पेन्शनचा लवकर निपटारा होतो. निवृत्त कर्मचारी यांचे जिवन पेन्शनवर अवलंबून असतो. मुख्य लेखा वित्त अधिकारी अजय पवार यांचेमुळे पेन्शनर्सचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. चांगली सेवा दिली जात असलेमुळे पेन्शनर्स ऋणी असल्याचे सांगितले.
No Result
View All Result