सोलापूर- प्रिसिजनचे संस्थापक चेअरमन आणि सोलापुरातील ज्येष्ठ उद्योगपती सुभाष रावजी शहा यांच्या १३ व्या पुण्यतिथी निमित्त आज १ ऑगस्ट रोजी प्रिसिजन कपंनीमध्ये रक्तदान शिबिराचे उद्धघाटन गोपाबाई दमाणी ब्लड सेंटरचे चेअरमन डॉ राजीव प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ७३ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
सुभाष रावजी शहा हे सोलापूरच्या सामाजिक व उद्योग क्षेत्रात रमलेले व्यक्तीमत्व, १९६५ साली सुभाष शहा यांनी आपले भाऊ विमलकुमार शहा यांच्या सोबतीने होटगी रोडवरील चेतन फौंड्री सुरू केली होती. ‘प्रिसिजन’च्या स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील प्रिसिजनचे दोन्ही युनिट सुभाष शहा यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झाले होते. स्व सुभाष रावजी शहा यांचे उद्योग क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे व सोलापूरकरांच्या उन्नतीसाठी त्यांचे योगदान मोठे होते असे डॉ प्रधान म्हणाले. यावेळी कपंनीचे संचालक रवींद्र जोशी, सीईओ अनितपाल सिंह व राजकुमार काशीद, पारितोष खेर, सुहास पाटील, सिद्धेश्वर चंदनशिवे, डॉ सुरेश जयदीप व दमाणी ब्लड बँकचे कर्मचारी उपस्थिती होते.
आज त्यांची १३ व्या पुण्यतिथी निमित्त दुपारी ठीक १२ वाजता संपूर्ण उत्पादन प्रक्रिया बंद करून सर्व कर्मचाऱ्यांनी १ मिनिट स्तब्ध राहून संस्थापक चेअरमन यांना अभिवादन केले. त्याच बरोबर कपंनीमधील सर्व फौंड्री व मशीन शॉप मधील कर्मचाऱ्यांनी आपाआपल्या काम करण्याच्या ठिकाणी उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. अक्कलकोट रोड MIDC मधील दोन्ही युनिट मध्ये देखील स्वर्गीय सुभाष रावजी शहा यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी कपंनीचे सर्व अधिकरी व कर्मचारी उपस्थित होते.