शिक्षण महर्षी आदरणीय स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
संस्थेच्या संचालिका डॉ. राधिकाताई चिलका मॅडम, डॉ.अण्णासाहेब लोखंडे, पंडित दीनदयाळ दंत महाविद्यालयाचे डॉ. सागर कुंभार, डॉ अजिंक्य अग्निहोत्री, लोकशाही फाउंडेशनचे वसीम बागवान यांच्या हस्ते मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर मॅडम, प्रशालेचे मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. तात्यासाहेब कोठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना संस्था संचालिका डॉ. राधिकाताई चिलका मॅडम यांनी स्व. तात्यासाहेबांच्या शैक्षणिक,सामाजिक राजकीय व आध्यात्मिक कार्याचा उल्लेख करून सदर शिबिरास शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना डॉ. अण्णासाहेब लोखंडे यांनी स्व. तात्यासाहेबांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.यावेळी शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची दंत तपासणी, नेत्र तपासणी, रक्त तपासणी व धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. सदर शिबिरात 842 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन बिभीषण सिरसट सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री नागेश कुमार काटकर सर यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय केगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र देगाव, दंत परिषद सोलापूर, लोकशाही फाउंडेशन सोलापूर यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.