एटीएम कार्ड, मोबाईल सह ३५,००० चा माल लंपास
येस न्युज मराठी नेटवर्क : दुचाकी खोदलेल्या रस्त्यामधून काढून देतो, असे सांगत दोन अनोळखी इसमांनी नयना ओमप्रकाश जाजू यांच्या पिशवीतील पर्स स्टार बेकरीनजीक काढून घेतल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे . नयना जाजु या चौपाडमधील दिवेकर बेकरीकडे जात असताना रस्ता खोदल्याचे पाहून दत्त चौकाजवळ दुचाकी घेऊन थांबलेल्या होत्या. त्यावेळी दोन इसमांनी त्यांना बोलण्यामध्ये गुंतवून गाडी काढून देण्याचे निमित्त करून पर्स चोरून नेली. या पर्समधील सात ग्रॅम वजनाची १०,००० रुपयांची सोन्याची अंगठी ५,००० रुपयांचा मोबाईल २०,००० रुपये रोख, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड असा जवळपास ३५ हजार रुपयांचा माल चोरीस गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भोसले या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.