आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे समाजपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. यंदा श्रावण महिन्यातील गोकुळष्टमी सोरेगावच्या हबीबा बालकाश्रमात साजरी केली. परंतु हया दहीहांडीला समाजप्रबोधन पर पोस्टर लावण्यात आले होते त्यात प्रामुख्याने सदयपरिस्थितीत स्त्रियांनावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारला वाचा फोडण्याचे संदेश होते.
बदलापूर मधील अत्यंत घृणास्पद बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेने आपण सारेच हादरले आहोत.ज्या चिमुकल्या जीवाने हया जगात नुकतेच पाऊल टाकले आई वडिलांपासून गुरुवर्यांना सोबत शिक्षणासारख्या पवित्र मंदिरात टाकलेले इवलेशी पावल अश्या काही नराधामच्या अमानुष कृत्यामुळे अंताकडे गेले.त्या चिमुरडयांची जीवघेणी व्यथा शक्यतो मुलांना कुणाला सांगता येत नाही किंबहुना काहीजण नामुशकीच्या भितीपोटी चुप्पी च धोरण धरतात.
आज भारतासारख्या विकसनशील देशात बाललैंगिक शोषण अपराध्याला फाशीची शिक्षा होते परंतु गुन्हा सिध्द होण्याची पुराव्याअभावी कित्येकदा अन्याय ला सामोरे जावे लागत.
पोलिस नियंत्रणेचे हात मर्यादित च असल्याने असे गुन्हेगार मोकाट समाजात वावरत असतात.
अश्या मोकाट नराधमांना लवकरात लवकर जेरबंद करुन पिडितास तात्काळ न्याय मिळवा हयासाठी आजची कृष्णजन्माष्टमी च्या हांडीवर ही समाज प्रबोधन चित्रफित लावून साजरी करत आहोत.आश्रमातील मुलांनी दहीहांडी भोवती फेरधरुन गाणी नृत्य सादर केले नंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.दहीहांडी फोडणा-या गोविंदा ला 501/- रुपायांचे बक्षिस देऊन त्यांच्या उत्साह वाढवला…….
अश्राममधील मुलांनी आनंद व्यक्त केला की पहिल्यांदा च आम्ही दहीहांडी कृष्णजन्माष्टमी साजरी करत आहोत.
हया कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या आस्थाच्या महिला सभासद निलिमा हिरेमठ ,कंचना हिरेमठ ,छाया गंगणे , नीता अकुर्डे,संगिता छंचुरे ,विदया माने,ज्योत्सना सोलापूरकर ,सुर्वणा पाटील,मोनिका, कविता कोडवेल, सत्यम सोलापूरकर, धर्मा कोडवेल, व आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे हबीबा आश्रमवतीने सुर्वणा बेले मॕडम यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे केले तर आभार प्रदर्शन सोलापूरकर मॅडम यांनी केले.