येस न्युज मराठी नेटवर्क : अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून कार्यकारीणी मध्ये बदल करण्यात आला. तालुका, जिल्हा, विभाग आणि प्रदेश असे सर्व पदाधिकारी बदलण्यात आले . त्यामध्ये प्रदेश सचिवपदी ह भ प मोहन शेळके यांची निवड करण्यात आली. ह.भ.प. भागवत महाराज चवरे पंढरपूर (राष्ट्रिय उपाध्यक्ष) यांनी सूचना मांडली आणि महाराष्ट्र प्रदेश सदस्य ह भ प अभिमन्यु डोंगरे महाराज यांनी अनुमोदन देऊन एकमताने निवड करण्यात आली. 2019 साली ह भ प मोहन शेळके यांना सोलापूर जिल्हा सचिव जबाबदारी देणेत आली होती. भजन,कीर्तन , प्रवचन, सप्ताह, ई. सर्व प्रकारचे कार्यात सहभागी होऊन सेवा सुरू आहे . त्यांना ह भ प माईसाहेब शेळके महाराज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच सोलापुरातील सर्व दिंडीला संघटित करण्याचे कार्य 1970 साली ह भ प नानासाहेब शेळके महाराज यांनी केले होते. त्यांचा वारसा मोहन शेळके महाराज यांनी चालू ठेवला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक सप्ताह संयोजकांना सहकार्य करून अनमोल कार्य चालू असून तो अनुभव आणि त्यांची काम करण्याची पद्धत पाहून त्यांच्याकडे प्रदेश सचिव पदाची जबाबदारी देणेत आली आहे , असे ह भ प सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) यांनी निवडी प्रसंगी म्हटले होते.
" मेळविली मांदी वैष्णवांची |"
श्री संत ज्ञानेश्वर महाराजानी 12 व्या शतकामध्ये त्या काळातील सर्व संताना एकत्रित करून वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी प्रयत्न केले होते. त्याच वाटेवरून जाण्यासाठी प्रयत्न व्हावा म्हणून वारकरी संप्रदायाचा प्रचार - प्रसार करण्यासाठी आवश्यक अशी कार्यकारीणी करणे गरजेचे आहे. शिवाय सर्वांना एकत्रित करून वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व बदल करण्याची कुवत पाहून ही निवड करण्यात आली आहे. या निवडी साठी ह भ प सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) यांनी गौरवोद्गार काढले व अभिनंदन ही केले. महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी व भाविकांनी अभिनंदन केले आहे.