सोलापूर – केन्द्रीय वस्तू आणि सेवा कर, अर्थात सेंट्रल जीएसटी, भारत सरकारच्या वतीने १६ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत जीएसटी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने, नूतन जीएसटी नोंदणी आणि बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण हयासंदर्भात केन्द्रीय वस्तू एवं सेवा कर, सोलापूर विभागातर्फे दि. २६ आणि २७ जून २०२५ रोजी स. १० ते सं. ६ ह्या वेळेत मा. सहायक आयुक्त, केन्द्रीय वस्तू एवं सेवा कर, सोलापूर विभाग यांचे कार्यालय, प्लॉट नं. ३, होटगी रोड, सोलापूर येथे माहिती आणि मदत केंद्र स्थापन करण्यात आहे. तरी संबंधितानी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर विभागीय कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी राजेश फुले, अधीक्षक, केन्द्रीय वस्तू आणि सेवा कर, सोलापूर विभाग यांच्याशी ९८२३१७३७२७ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.