सोलापूर – समाजातील अनिष्ट प्रथा रुढींवर आसूड ओढणारे, स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे महान समाज सुधारक संत गाडगे महाराज यांना जयंती निमित्त सोलापूर जिल्हा परिषदेत अभिवादन करणेत आले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे हस्ते संत गाडगे बाबा यांचे प्रतिमेचे पडून करणेत आले.
या प्रसंगी लेखाधिकारी रूपाली रोकडे मॅडम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहाय्यक प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, अधिक्षक विवेक लिंगराज, वरिष्ठ सहाय्यक संतोष जाधव, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे, घन कचरा सल्लागार मुकूंद आकुडे, प्रशांत दबडे, संपादणूक समन्वयक अर्चना कणकी, अल्फिया बिराजदार, यांचे सह कर्मचारी उपस्थित होते.
दक्षिण सोलापूर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी परिसर स्वच्छता करून संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करणेत आली. जिल्ह्यात पंचायत
समिती स्तरावर तसेच ग्रामपंचायत स्तरावर संत गाडगे बाबा यांना अभिवादन करणेत आले.