जागृती विद्यामंदिरात चंद्राम चव्हाण गुरुजी यांना अभिवादन..

0
19

सोलापूर : नेहरूनगर येथील मागास समाज सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जागृती विद्या मंदिर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला येथे कार्यक्रम घेण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण व डॉ. शिरीष कुमठेकर यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष
कार्तिक चव्हाण, विजयरत्न चव्हाण, रवी चव्हाण, माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, मोहन राठोड व प्रशालेचे क्रीडाशिक्षक संतोष जाधव यांनी गुरुजींच्या शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली. पर्यवेक्षकांनी गुरुजींच्या सामाजिक कार्याविषयी व तळागाळातील लोकांसाठी केलेल्या कार्याविषयी परिचय करून दिला. याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.