सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती दिनानिमित्त सात रस्ता येतील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास तसेच कौन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस महापालिकेचे सहाय्यक आयुक्त पुष्पागंधा भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विभागीय अधिकारी महेबुब शेख, कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, राजू पवार, सिद्धू तिमीगार आदी मान्यवर उपस्थित होते.