सोलापूर– सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने थोर मानवतावादी डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंती दिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील मा आयुक्त यांच्या कार्यालयात डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रतिमेस महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रुग्णालय येथील डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, विभागीय अधिकारी नंदकुमार जगदनी, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, गणेश चन्ना,श्री मोहिते,अशोक खडके, सिद्धू तिमीगार, यल्लाप्पा पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.