सोलापूर : शहरातील देवांशी अक्षय जव्हेरी यांच्या डी.जे.गरबा क्लासेस तर्फे दरवर्षी गरबा वर्कशॉप चे आयोजन करण्यात येते. ते गेल्या १५ वर्षापासून बेसिक, ॲडव्हान्स गरबा, दांडिया, फ्री स्टाईल, दोधियु असे गुजरात चे पारंपरिक तथा लेटेस्ट स्टेप्स शिकवतात. आता पर्यंत ५००० पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्याकडे शिकले असून. गेल्या तीन वर्षापासून गुजरात येथून गरबा किंग व गरबा क्वीन यांना शिकविण्यासाठी आमंत्रित करतात.
सोलापूर शहरातील प्रथम गुजराती फ्युजन अल्बम त्यांनी निर्मित केले असून ते youtube वर फार कमी वेळेत लोकप्रिय सुद्धा झाले आहे. या वर्षी त्यांनी विवध बॅचेस द्वारे ट्रॅडिशनल, basic आणि advance steps शिकविले गेले….devanshi या स्वतः प्रशिक्षित गरबा choreographer असुन ते स्वतः गुजरात येथे शिकले आहेत…त्यांनी अनेक विवध ठिकाणी प्रशिक्षण दिले आहे…शहरातील लोकांचा कल पारंपारिक गरबा कडे व नवरात्री चे ९ दिवस देवीचे स्मरण करून त्याचे आनंद घेता यावे हे उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले….