महाविकासआघाडी 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चा काढणार आहे. राणीची बाग ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे. महाविकासआघाडीच्या झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. राज्यपालांना हटवण्याची मागणी महाविकासआघाडीने केली आहे. पण त्याआधी जरी राज्यपालांना हटवलं गेलं तरी मोर्चा हा निघणारच असं विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. बैठकीनंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात हा मोर्चा असणार आहे. न भुतो न भविष्यती असा हा मोर्चा असेल. असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
8 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार आहे. आमच्या काही घटक पक्षांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. सर्व नागरिकांनी देखील यावं अशी विनंती करत आहेत. बेरोजगारीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. शिंदे आणि फडणवीस हे आपयशी राहिले आहेत. उद्योग महाराष्ट्रातून जात आहेत आणि जे आहेत ते देखील घालवत आहेत. असा आरोप देखील अजित पवार यांनी केला आहे.