मुंबई : पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीने धोरण ठरवावं, जेणेकरुन वाद होणार नाहीत, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ मागितली असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळ बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
नाना पटोले म्हणाले की, “याविषयी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. या विषयाचे मूळ फडणवीस सरकार आहे. 2017 पासून अनेक विषय पेंडिंग ठेवलं तेव्हापासून आतापर्यंत रेंगाळत आहे. ही कायदेशीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबत सविस्तर चर्चा करु आणि त्यानंतर भूमिका मांडू. यावर आता वक्तव्य करणार नाही. पदोन्नतीमधील आरक्षण धोरण सरकारने ठरवून घ्यावं, यामुळे वाद निर्माण होणार नाही.