सोलापूर – जिल्हा परिषदेत देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत आले. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हा परिषदेचा शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, मुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता खराडे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिरकले, जिल्हा कृषी अधिकारी वाघमोडे, शिक्षणाधिकारी मारुती फडके, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, उपशिक्षणाधिकारी संजय जाविर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, लेखाधिकारी पाटील, जिल्हा प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे पुजन सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते करणेत आले. त्यानंतर सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले.शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. देशभक्तीपर पर घोषणा यावेळी देणेत आल्या. मुलांनी देशभक्तीपर गीते सादर केली.यावेळी सिईओ मनिषा आव्हाळे यांनी सर्व महिला कर्मचारी व पुरूष कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सोलापूरकरांना शुभेच्छा देताना तंबाखू मुक्तीसह जिल्हा परिषदेमध्ये प्लास्टिक मुक्तीचा संकल्प केला. या प्रसंगी सर्व महिला व पुरूष कर्मचारी यांची जागेवर जाऊन भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते लहान मुलांना मिठाईचे वाटप करणेत आले.
सिंगल युज प्लास्टीकचा वापर टाळा – सिईओ आव्हाळे
प्लास्टिक च्या वापरामुळे पर्यावरणाची खुप मोठी हानी होत आहे. प्लास्टिक चा वापर टाळा. असो आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले. प्लास्टीक मुक्तीचा गावोगावी संकल्प करा. जिल्हा परिषदेत पिणे साठी स्टील किंवा काचेचे बाटलीचा वापर करा असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले.