जिल्हयातील गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभाग नोंदवण्याचे आवाहन
सोलापूर – गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देणेसाठी विजेत्यांची निवड करण्यासाठी कार्यपध्दती खालील प्रमाणे ठरविण्यात आलेली आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा परवानधारक मंडळे यांना सहभागी होता येईल.
स्पर्धेत सहभागी होणा-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड पुढील निकषांच्या आधारे करण्यात येईल. गुणांकनासाठी बाब व गुणांकन पुढीलप्रमाणे – कलांचे जतन व संवर्धन -२०, संस्कृतीचे जतन व संवर्धन-२०, निसर्गाचे व सार्वजनिक संपत्तीचे जतन व संवर्धन-20, सामाजिक कार्य -२० , गणेशोत्सव आयोजनातील विधायकता -२० असे एकूण 100 गुणांकन असणार आहेत.
या स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यासाठी पुढील प्रमाणे जिल्हास्तरीय निवड समिती गठीत करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, अध्यक्ष, शासकीय कला महाविदयालयातील कला प्राध्यापक, सदस्य, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, सदस्य, जिल्हयातील पोलिस अधिकारी, सदस्य, तसेच जिल्हा नियोजन अधिकारी, सदस्य सचिव, व जिल्हयातील प्रयोगात्मक (गायन, वादन, नृत्य, लोककला इत्यादी) कलेतील १ व दृछ्यात्मक (चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकला इत्यादी) कलेतील १ अशी एकूण २ कलाकराची अशासकीय सदस्य म्हणून निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे.
स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यासाठी प्रत्येक तालुक्यास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. तहसिलदार, अध्यक्ष, मुख्याधिकारी, सदस्य, महानगरपालिकेचे वार्ड ऑफिसर सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता विदयुत / स्थापत्य, सदस्य, पोलिस निरीक्षक/प्रभारी पोलिस स्टेशन, तसेच त्या त्या तालुक्यातील प्रयोगात्मक (गायन, वादन, नृत्य, लोककला इत्यादी) कलेतील १ व द्व्यात्मक (चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकला इत्यादी ) कलेतील १ अशी एकूण २ कलाकराची अशासकीय सदस्य म्हणून निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे.
स्पर्धत सहभागी होणा-या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकरिता मार्गदर्शक तत्वे/कार्यपध्दती पुढीलप्रमाणे राहील- . या स्पर्धासाठी संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी हे समन्वयक असतील. २. सदर स्पर्धेत केवळ नोंदणीकृत संस्था अथवा परवानाधारक मंडळे सहभागी होऊ शकतात. ३. पात्र अर्जदार मंडळांनी अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या पोर्टलव्दारे विहित वेळेत आपला अर्ज सादर करावयाचा आहे. ४. गणेशोत्सव स्पर्धेअंतर्गत भाग घेणा-या मंडळांपैकी चालू आर्थिक वर्षाच्या मागील सलग दोन वर्ष राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय पारितोषिके प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. सदरची अट इतर मंडळांना संधी देण्याच्या उददेशाने नमूद करण्यात आली आहे. ५. सदर स्पर्धेत सहभागी होणा-या मंडळांसाठी त्यानी केलेल्या कामांचा कालावधी मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशी पासून चालू वर्षाच्या अनंत चतुदशी पर्यंत असेल. ६. स्पर्धेच्या परिक्षणासाठी निवड समितीने दिलेल्या दिवशी व वेळी संबंधित कागदपत्रे व माहिती समितीला उपलब्ध करुन देणे, ही संबंधित मंडळाची जबाबदारी असेल. समितीने घेतलेल्या निर्णयावर कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आक्षेप घेता येणार नाही. ८. विजेत्या गणेशोत्सव मंडळास स्पर्धेतील त्यांनी प्राप्त केलेल्या सर्वोच्च पुरस्काराचीच रक्कम देण्यात येईल. उदा. तालुकास्तरीय स्पर्धेतील एखादया सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची तालुकास्तरावरील पारितोषिकाकरिता निवड झाल्यास व नदनंतर जिल्हास्तरावरील पारितोषिकाची रक्कम जास्त असल्याने केवळ जिल्हास्तरावरील पारितोषिकाची रक्कम प्रदान करण्यात येईल.
जिल्हाधिकारी सोलापूर यांनी जिल्हयातील सर्व गणेशोत्सव मंडळानी स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.