येस न्युज नेटवर्क : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोनं 80 हजाराच्या पुढे जातं की काय? असं विचारलं जात आहे. जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर पाहायला मिलत आहे. दरम्यान, आजदेखील सोने आणि चांदी हे दोन्हीही मौल्यवान धातू महागले आहेत. आजच्या भाववाढीनंतर सोने आणि चांदीचा भाव उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
सोन्यासोबतच चांदीच्या भावातही वाढ
एमसीएक्स आज सोन्याच्या दरात प्रति तोळा 450 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. म्हणजेच आता सोन्याचा दर 78170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीमध्येही आज मोठी तेजी पाहायला मिळाली. आज चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे 2800 रुपयांची वाढ झाली.
सोन्याच्या भावात सातत्याने वाढ
सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. या वाढीसह सोनं रोज नवनवे रॉकर्ड रचत आहे. शुक्रवारीदेखील सोन्याच्या दरात वाढ झाली होती. हा दर त्या दिवसाचा ऑल टाईम हाय वर पोहोचला होता. त्यामुळे सोमवारीदेखील सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे आजदेखील सोन्याच्या भावात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. भारतात सध्या सणासुदीचा काळ आहे. या काळात भारतीय मौल्यवान दागिने खरेदी करतात. सोने आणि चांदी या धातूंची या काळात मोठ्या प्रमाणात विक्री होते. असे असताना आता सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे फक्त भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
सोनं भविष्यात 85 हजारांपर्यंत जाणार
गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आकडेवारीत सांगायचं झालं तर सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना वर्षभरात 29 टक्के रिटर्न्स मिळालेले आहेत. या वर्षी 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 21 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत.