आई तुळजाभवानीला भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीची मोजमाप सुरू झालीय. रोज सकाळी 10 सायंकाळी 6 वेळेत ही मोजमाप केली जाणार आहे. देवीला अर्पण केलेल्या ऐवजाची 10 वर्षांनंतर प्रथमच मोजणी होतेय. तरीही अंदाजे 200 किलो सोने, 4 हजार किलो चांदी जमा झाल्याचं बोललं जातंय. या सगळ्या ऐवजाची मोजमाप करण्याचासाठी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तुळजापूर मंदिरातील सोने वितळण्याच्या प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. आरबीआयकडून सोने वितळून दिले जाणार आहे.
मंदिराच्या दर्शन मंडपातील चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये कडक सुरक्षेत हे काम सुरू करण्यात आलंय. पहिल्या दिवशी एक पेटी मोजणीसाठी आणली गेली. या पेटीत 720 पाकिटे होते.सगळीकडे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी एक पेटी मोजदादसाठी आणली गेली होती. पेटीत 720 पाकिटे होते. त्यापैकी 105 पाकिटांतल्या सोन्याची मोजदाद करण्यात आली आहे. रोज सकाळी 10 ते सांयकाळी 6 या वेळेत मोजमाप करण्यात येणार आहे.