सोलापूर: दि.10 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर 20 वा दीक्षांत समारंभात मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन तसेच पद्मभूषण डॉ.ज्येष्ठराज जोशी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत कुमारी मंजुश्री कांबळे हिला दिवंगत मातोश्री काशीबाई कल्लाप्पा रवी स्मर्णार्थ सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले आहे.
तिने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कन्नड विभागात मुलीमध्ये सीजीपीएत पहिला क्रमांक येण्याची मान मिळवला आहे. भाषा व वाड.मय संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे विद्यापीठाची कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर प्रो कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी अभिनंदन व्यक्त केला आहे. हिला भाषा व वाड.मय संकुलतील कन्नड विभागाचे प्राध्यापक डॉ. शिवानंद तडवळ, डॉ. गौरम्मा येळंगडी यांच्या मार्गदर्शन लाभला होती. अत्यंत गरिबी परिस्थितीत तिने जिद्द कसोटी केलेल्या साधनाला सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.